Home अहमदनगर अहमदनगर: हुक्का पार्लरवर छापा, एकास अटक

अहमदनगर: हुक्का पार्लरवर छापा, एकास अटक

Breaking News | Ahmednagar: हुक्का पार्लरवर शहर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकत साहित्य जप्त
Ahmednagar Raid on Hookah Parlor
अहमदनगर: सावेडी उपनगरातील कुष्ठधाम रोडवरील सोनानगर चौकात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर शहर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकत साहित्य जप्त केले. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश संतोष हिंगे (रा. बोरुडेमळा, ता. पंचशीलनगर, बालिकाश्रम रोड) असे हुक्का पार्लर मालकाचे नाव आहे. याप्रकरणी सय्यद अनिस युसूफ (वय २०, रा. कबाडगल्ली, पंचपीर चावडी, माळीवाडा) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सावेडी उपनगरातील कुष्ठधाम रोडवरील सोनानगर चौकात एजीस कॅफे हाऊस अॅण्ड हुक्का पार्लरमध्ये कॅफे व हुक्का पार्लर एकत्रित चालविले जात होते. तिथे काहीजण हुक्का पिताना आढळून आले. पोलिसांनी झडती घेतली असता काचेचे पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, असा एकूण ९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पार्लरमध्ये काऊंटरवर एक व्यक्ती आढळून आली. त्या व्यक्तीने कॅफे मालकाचे नाव सांगितले.

Web Title: Ahmednagar Raid on Hookah Parlor

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here