Home Accident News सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू, लहान भावाला भेटायला जाताना……

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू, लहान भावाला भेटायला जाताना……

Breaking News | Amravati: सैन्यातील जवानाच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने जवानाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना. (Accidental death).

Accidental death of a soldier on leave

अमरावती : दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या सैन्यातील जवानाच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने जवानाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र गंभीररीत्या जखमी असल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी १ वाजताच्या दरम्यान रहाटगाव टी-पॉईंट नजीक हॉटेल गौरी इनजवळ घडली. अविनाश अंबादास उईके (वय २४, रा. गणेशपुर ता.वरुड) असं अपघातात ठार (Death) झालेल्या जवानाचे नाव आहे. तर विशाल सुखराम तुमडाम (वय १९, रा. टेंभुरखेडा असं जखमी युवकाचं नाव आहे. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे.  या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

चार वर्षांपूर्वी देशसेवेचं व्रत घेऊन अविनाश उईके सैन्यात दाखल झाले. सध्या ओडिसा याठिकाणी अविनाश उईके कार्यरत होते. याठिकाणी एक प्रशिक्षण आटोपून दोन दिवसांपूर्वी अविनाश सुट्टी मिळाल्याने आपल्या गावी गणेशपूर येथे आले होते. बुधवारी अमरावतीत शिकणाऱ्या आपल्या लहान भावाच्या भेटीसाठी अविनाश आणि विशाल दोघेही दुचाकी क्र.एम.एच.२७ डी.जी.३९४४ने मोर्शीवरुन अमरावती येथे येत होते. येताना सकाळी १ वाजताच्या दरम्यान रहाटगाव टी-पॉईंट येथे अज्ञात भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, जवान अविनाश हे जागीच ठार झाले. तर विशाल गंभीर जखमी झाला आहे.

घटना घडताच नागरिकांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. नांदगाव पेठ पोलीसांनी घटनेची तात्काळ दखल घेत घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Accidental death of a soldier on leave

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here