Home Accident News अहमदनगर: रिक्षा व मोटारसायकल धडकेत एकुलता एक मुलाचा मृत्यू

अहमदनगर: रिक्षा व मोटारसायकल धडकेत एकुलता एक मुलाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: रिक्षा व मोटार सायकल धडकेत माळवाडगाव येथील जेसीबी चालक असलेला कुटुंबाचा आधार असलेला एकुलता एक मुलाचा मृत्यू.

only child died in a collision between a rickshaw and a motorcycle Accident

श्रीरामपूर:  श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील हनुमानवाडी परीसरात माल वाहतूक रिक्षा व मोटार सायकल धडकेत माळवाडगाव येथील जेसीबी चालक असलेला कुटुंबाचा आधार असलेला एकुलता एक गौरव दांगट याचा मृत्यू झाला तर माल वाहतूक रिक्षातील चांदा व घोडेगाव येथील दोन महिला जखमी झाल्या. किरकोळ जखमी असलेल्या महिलांची प्राथमिक उपचारानंतर गावाकडे रवानगी करण्यात आली. सुदैवाने रिक्षातील मुले सुखरूप आहेत. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत श्रीरामपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल नव्हता.

नेवासा तालुक्यातील चांदा व घोडेगाव येथील एक पुरूष, तीन महिला व तीन मुले असे सातजण टाटा एसीई क्र. एमएच १७ एजी ५८६२ या माल वाहतूक रिक्षाने माळवाडगाव येथील एका नातेवाईकास भेटण्यासाठी गेलेले होते. तेथून काल शुक्रवार दि.२९ फेब्रुवारीच्या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चांदाकडे जात असताना भोकर शिवारातील हनुमानवाडी परीसरात खोकरफाटा ते खानापूर रोडवर समोरून येणाऱ्या मोटारसायकल क्र. एमएच १७ एएस २६८९ यांची जोराची धडक झाली. यात मोटारसायकल चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात मालवाहतूक करणारी रिक्षा उलटली. ही धडक इतकी जोराची होती की त्यात मोटार सायकलवरील माळवाडगाव येथील जेसीबी चालक असलेला

व दांगट कुटुंबाचा आधार असलेला एकुलता एक गौरव नानासाहेब दांगट हा गंभीर जखमी झाला त्यास हनुमानवाडी येथील डॉ. सागर अभंग, मारूती शिंदे, गणेश कांबळे, संदीप निंबाळकर, ग्रामविकास अधिकारी संजय बारसे, आप्पासाहेब शिंदे आदिंसह परीसरातील महिला व पुरूषांनी अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्ताना मदत केली. यात रिक्षातील चांदा येथील जया संजय फरसाळे व घोडेगाव येथील रोहीणी राधाकिसन सावंत या दोघींना चांगलीच दुखापत झाली. गंभीर जखमी गौरव दांगट यांस रूग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने परिसरातील सुज्ञ नागरीकांनी खाजगी वाहनाने तातडीने प्रथम श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवाना केले तेथून पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुर्दैवाने रात्री उशीराने गौरव याची प्रवरा हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली. गौरव हा अविवाहित व एकुलता एक मुलगा होता. त्याचे पश्चात वृद्ध आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर काही वेळाने येथील तरुणांच्या समुहाने उलटलेली रिक्षा सरळ करून दिल्याने जखमी महिलांसह सर्वजण नेवासाकडे रवाना झाले. हा अपघात कसा घडला हे समजू शकले नाही. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत श्रीरामपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल नव्हता.

Web Title: only child died in a collision between a rickshaw and a motorcycle Accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here