Home अहमदनगर १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी गर्भवती

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी गर्भवती

Ahmednagar Rape of a 16-year-old girl

अहमदनगर | Ahmednagar: नगर तालुक्यातील उक्कडगाव परिसरातील राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन विध्यार्थीनीवर एकाने वेळोवेळी शेतात नेऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पिडीत विद्यार्थिनी ही गर्भवती असून तिने नगर तालुका पोलिसांत फिर्याद दिली असून बाल्त्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सोमनाथ भानुदास म्हस्के रा. उक्कडगाव याने पिडीत मुलीची संमती नसताना देखील बळजबरीने चुलत भाऊ दादासाहेब म्हस्के यांच्या शेतात नेऊन वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून बलात्कार केला. १४ फेब्रुवारी २०२० ते ४ जुलै २०२० या कालावधीत म्हस्के याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याने सदर मुलगी गर्भवती असून तिने काल नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून आरोपी सोमनाथ भानुदास म्हस्के याच्याविरुद्ध नगर पोलिसांत बाल्त्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर ग्रामीण पोलीस डीवायएसपी तसेच सहायक पोलीस निरीक्षक राजपूत यांनी भेट दिली असून अधिक तपास पोसई जारवाल हे करीत आहे.

Web Title: Ahmednagar Rape of a 16-year-old girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here