Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील या ग्रामपंचायतीत आचारसंहितेचा भंग

संगमनेर तालुक्यातील या ग्रामपंचायतीत आचारसंहितेचा भंग

Violation gram panchayat in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: तालुक्यातील कुरण या गावात आचारसंहितेचा भंग करण्यात आला आहे असा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे.

कुरण ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी विकास मंडळ व शेतकरी परिवर्तन आघाडी असे दोन पॅनल आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार हा १३ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजता संपला.निवडणूक अधिकार्यांनी प्रचार बंद करण्याची वेळ मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत.  असे असले तरी शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते व आचारसंहितेचा भंग करून प्रचार सभा सुरु ठेवली. याबाबत ग्रामपंचायत सीसीटीव्हीत चित्रीकरण झालेले आहे.

१३ जानेवारी रोजी प्रचारासाठी ११ ते २:३० ही वेळ दिलेली असताना दुपारी तीन ते साडे तीन पर्यंत प्रचार सुरु होता.  शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते व उमेदवार यांनी आचारसंहितेचा भंग केला असून गंभीर गुन्हा केला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी असे तक्रार अर्जात म्हंटले आहे.  तक्रारदारावर शेख यांचे नाव व सही आहे. याबाबत चौकशीसाठी कुरण ग्रामपंचायतकडून अहवाल मागितला आहे.

Web Title: Violation gram panchayat in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here