Home अहमदनगर Rape Case: महिलेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Rape Case: महिलेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Ahmednagar Rape of a woman by showing her the lure of marriage

अहमदनगर | Rape Case Ahmednagar: विवाहित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबध प्रस्थापित करून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात खुशाल ठारुमाल ठक्कर रा. केडगाव याच्या विरोधात बलात्कार (rape), फसवणूक व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव येथील विवाहित महिलेशी आरोपीचे नात्याचे संबंध होते. पिडीत महिलेचा नवरा व्यसनाधीन असल्याचा फायदा घेत आरोपीने पिडीत महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिला शहरातील अरणगाव रोडला राहण्यास आणले.

अरणगाव येथील महिलेला तिच्या राहत्या घरी तिच्या इच्छेविरुध्द आरोपीने 2 एप्रिल 2019 ते 4 ऑक्टोबर 2021 पर्यंत या कालावधीत शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

पिडीत महिलेने आरोपीस लग्नाची विचारणा केली असता, त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपी खुशाल ठारुमल ठक्कर याने पिडीत महिलेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून

तिच्यावर इच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून  खुशाल ठारुमल ठक्कर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये  पोलिसांनी कलम 376, 420, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar Rape of a woman by showing her the lure of marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here