Home अकोले अहमदनगरच्या या साखर कारखान्याने दिला सर्वाधिक उस दर

अहमदनगरच्या या साखर कारखान्याने दिला सर्वाधिक उस दर

Ahmednagar highest sugarcane rate offered by  Agasti sugar factory Akole

अहमदनगर | Ahmednagar News: राज्यातील साखर कारखाने अतिशय कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असताना अगस्ती साखर कारखाना अकोले (Agasti sugar factory Akole)यांनी प्रतिटन ५०० ते ६०० रुपये आर्थिक नुकसानीस सामोरे जात एफआरपीनुसार सर्वाधिक उसाला दर दिला आहे.  

देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन वाढले मात्र बाजारात साखरेस मागणी नाही असे असताना जिल्हा सहकारी बँकेने वेळोवेळी सहकार्य केल्याने अगस्ती उस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक उस दर दिले आहे. सर्वांच्या योगदानामुळे हे शक्य झाल्याचे अगस्तीचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी म्हंटले आहे. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा २८ वा गळीत हंगामाचा बॅायलर अग्निप्रदिपन समारंभ रविवारी पार पडला. यावेळी गायकर बोलत होते.

अगस्तीला शासनाकडून २५०० वरुन ३५०० टन प्रतिदिन ऊस गाळपाची मंजूरी मिळाली, असेही गायकर म्हणाले.

Web Title: Ahmednagar highest sugarcane rate offered by  Agasti sugar factory Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here