Home अहमदनगर रेमडेसिवीर काळ्याबाजारात जास्त दराने विकणारे तीन आरोपी ताब्यात

रेमडेसिवीर काळ्याबाजारात जास्त दराने विकणारे तीन आरोपी ताब्यात

Ahmednagar Remadesivir arrested for selling black market 

अहमदनगर: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांना  रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही तर दुसरीकडे काळा बाजार सुरु आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल दोन ठिकाणी छापे टाकत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून इंजेक्शन, मोबाईल, स्कॉर्पियो असा  मिळून सात लाख ३२ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना तारडे हॉस्पिटल व काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेजच्या कमानीजवळ काही जण रेमडेसिवीर इंजेक्शन जास्त विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना बोलावून पथकाची नियुक्ती करून त्यांनी सापळा रचला.

रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर बनावट ग्राहकांच्या मदतीने संपर्क करून विचारपूस केली. त्याने एका इंजेक्शनची किमत २७ हजार रुपये सांगितली. खरेदीसाठी होकार दिला असता त्याने बालिकाश्रम रोड वरील तारडे हॉस्पिटलच्या परिसरात येण्यास सांगितले. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी बनावट ग्राहक इंजेक्शन खरेदीसाठी पाठवून हेमंत दत्तात्रय कोहक वय २९ रा. बोल्हेगाव यास पकडले. त्याच्याकडील मोबाइल, इंजेक्शन, स्कॉर्पियो असा सात लाखांचा मुदेमाल जप्त करण्यात आला. त्याने हे इंजेक्शन महेश दशरथ मते रा. पाईपलाईन रोड , प्रदीप मारुती मगर रा. तागड वस्ती यांनी मिळून दिले असल्याचे सांगितल्याने तिघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच काकासाहेब म्हस्के कॉलेज परिसरात बनावट ग्राहक मध्यस्थीने संपर्क केला असता स्थानिक शाखेच्या पथकाने भागवत मधुकर बुधवंत व आदित्य बाबासाहेब म्हस्के अशा दोघांना पकडले. त्यांच्याकडून मोबाईल इंजेक्शन जप्त करण्यात आली.

Web Title: Ahmednagar Remadesivir arrested for selling black market 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here