Home अहमदनगर लाच प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत पथकाकडून कारवाई,  तिघांवर गुन्हा

लाच प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत पथकाकडून कारवाई,  तिघांवर गुन्हा

Bribery squad takes action against three police 

अहमदनगर | Ahmednagar: अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस उपअधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील पोलिसांनीच वाळू व्यावसायिकाकडे पंधरा हजार रुपयांची लाच(Bribary) मागितल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तीन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार झाले आहेत. शेवगाव पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील हे कर्मचारी आहेत. एक जण वायरलेस ऑपरेटर तर दोघे विशेष पथकातील आहे.

या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी पाथर्डीच्या एका वाळू व्यावसायिकाकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

वाळूचेलिलाव झालेले नाहीत. कंत्राटदार बीड जिल्ह्यातून वाळू आणत असत. असेच एक वाळूची वाहतूक करणारे वाहन या तिघांनी पकडले होते. वाहन कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि हा धंदा सुरु ठेवण्यासाठी १५ हजार रुपयांची लाचेची मागणी पोलिसांनी कंत्राटदाराकडे केली. मात्र पाथर्डी येथील कंत्राटदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. तसेच रेकॉर्डिंगचे पुरावेही दिले. त्यांनतर एसीबीच्या पथकाने सापळ्याची तयारी सुरू केली. लाच मागितली जात असल्याची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यातून तक्रारीत तथ्य आढळून आले.

संदीप वसंत चव्हाण व कैलास नारायण पवार हे दोघे विशेष पथकातील कर्मचारी रा. पाथर्डी आणि वसंत कान्हू फुलमाळी वायरलेस ऑपरेटर  रा, पाथर्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. 

Web Title: Bribery squad takes action against three police 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here