Home अहमदनगर दरोडेखोरानी टोलनाका लुटला

दरोडेखोरानी टोलनाका लुटला

Ahmednagar robbers looted Tolnaka

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेच दिसून येत आहे. घरफोडी, दरोडेखोर, चोरी अशा गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

सोलापूर रोडवरील कॅन्टोनमेंट टोलनाका येथे रात्री स्कॉर्पिया व दुचाकीवरून आलेल्या दहा दरोडेखोरानी टोलनाक्यावर धुमाकूळ घालून लुटण्यात आला.

टोल नाकाचे प्रमुख अजय सुगंध शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. टोलनाका सुपरवायझर सचिन पवार यांना कोयत्याने मारहाण करण्यात आली.

टोलनाक्याच्या गल्ल्यातील सुमारे ४६ हजार रुपये रक्कम लंपास करून पळून गेले. संदीप शरद शिंदे रा. भागवत चाळ ता. नगर, विक्रम गायकवाड व बाबा आढाव रा. वाळूंज पारगाव ता. नगर, संदीप वाकचौरे रा. दरेवाडी ता. नगर, प्रकाश कांबळे, इतर दोन अनोळखी व्यक्तीविरोधात भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Ahmednagar robbers looted Tolnaka


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here