Home कर्जत अंबालिकाजवळ झालेल्या खुनाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अंबालिकाजवळ झालेल्या खुनाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Vanchit Bahujan aghadichi demands investigation into murder

कर्जत: तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या चालकाला कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी ट्रक्टर चोरीच्या संशयातून मारहाण करून त्याचा खून केला.

याबाबत सखोल चौकशी करून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे व मयत कुटुंबीयांनी दिला आहे. अशी माहिती शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे बारसे व मयताच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी इशारा देण्यात आला. कोपर्डी येथील मयत समाधान रमेश शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल आहे. मात्र वैद्यकीय अहवालाप्रमाणे मयताच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे या आरोपीवर ३०२ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी मयताचे भाऊ बाळू रमेश शिंदे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Vanchit Bahujan aghadichi demands investigation into murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here