Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: आरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: आरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू

Ahmednagar RPF jawan killed in accident

Ahmednagar | अहमदनगर:  जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना घडली आहे. नगर दौंड रोडवरील काष्टी मध्ये आज पहाटेच्या सुमारास ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली आणि चारचाकी गाडीची धडक होऊन या अपघातात (Accident) दौंड येथे कार्यरत असलेले आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे.

बाबा कारंडे हे दौंड वरून आपल्या गावाकडे निघाले होते पहाटेच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर रोडने जात असताना ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर आणि चार चाकी यांच्यात धडक होऊन अपघात घडला.

या धडकेत आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने दौंड रेल्वे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. ड्युटी संपवून घरी जात असताना झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या सहकार्यांना दौंड येथे कळताच अनेकांनी कष्टीला धाव घेतली होती. काही तासांपूर्वी आपल्या बरोबर असलेला सहकारी अपघातात मृत्यू पावला ही बातमी समजल्याने अनेकांना धक्का बसला.  त्यांच्या या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

We Title: Ahmednagar RPF jawan killed in accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here