Home क्राईम प्रियकराने प्रेयसीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या दिल्या अन घडले असे काही..

प्रियकराने प्रेयसीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या दिल्या अन घडले असे काही..

boyfriend sexual abuse and gave the abortion pills to his girlfriend

नागपूर | Nagpur Crime: सदर तरुणी ही अठरा वर्षांची आहे. ती मूळची भंडारा जिल्ह्यातील शिक्षण घेण्यासाठी सुनील सावसाकडे हा भंडाऱ्यात गेला होता. सुनील हा मूळचा भिवापुरातील दिघोरा वस्तीत राहणारा. दरम्यान, या दोघांची ओळख झाली. यातूनच दोघाचे प्रेमात रुपांतर झाले.

सुनीलने 30 नोव्हेंबर 2021 रोजी सदर युवतीला भिवापूर येथे बोलावले. दुपारी घरी कुणीही नसल्यानं त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अनेकदा त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. सुनील आपल्याशी लग्न करेल, असा तिचा समज होता पण तसे काही झाले नाही. या संबधातून ती गरोदर राहिली. सुनीलने तिला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या. डिसेंबर 2021 रोजी तिने अठरा वर्षे पूर्ण केली. त्यामुळं तू माझ्याशी लग्न कर, असा तगादा तिने लावला. पण, सुनीलने त्याकडे दुर्लक्ष करत लग्नास नकार दिला. अन त्यामुळं संबंधित युवती कारधा पोलिसांत धाव घेतली अन  तिने त्याच्याविरोधात बलात्काराची फिर्याद दिली.

प्रेयसीच्या तक्रारीवरून भिवापूर पोलिसांनी सुनीलविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार (sexual abuse) प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  प्रियकरास अटक करण्यात आली आहे.  शनिवारी त्याला न्यायालयात हजर असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात सहायक महिला पोलिस निरीक्षक खोब्रागडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: boyfriend sexual abuse and gave the abortion pills to his girlfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here