Home अहमदनगर आमच्या नेत्यांमध्ये दोन काय चार बायका सांभाळण्याची ताकद: खा. सदाशिव लोखंडे

आमच्या नेत्यांमध्ये दोन काय चार बायका सांभाळण्याची ताकद: खा. सदाशिव लोखंडे

Ahmednagar Sadashiv Lokhande has given replay to former minister Ram Shinde

अहमदनगर | Ahmednagar: ज्या नवरयामध्ये दोन बायका सांभाळण्याची ताकद असते तो दोन काय चार बायकाही सांभाळू शकतो, असे प्रत्युत्तर खा. सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिले आहे.

संपूर्ण नगर जिल्ह्यात आज विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी दुध आंदोलने केली. कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे झालेल्या आंदोलनात माजी मंत्री राम शिंदे यांनी सरकारवर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते एका नवरयाच्या दोन बायका असे हे तिघाडी सरकार आहे. शेतकऱ्यांचे त्यांना काही देणे घेणे नाही. हे सरकार सर्व गोष्टींवर अपयशी ठरले आहे. कधी कोसळेल सांगता येत नाही.

नगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीच्या निमित्ताने खा. सदाशिव लोखंडे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राम शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी खा. सदाशिव लोखंडे म्हणाले, दुध उत्पादक संतापले आहे. दुधाला बाजारभाव नाही. त्यामुळे केंद्रसरकारने व राज्य सरकारने निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले पाहिजे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Ahmednagar Sadashiv Lokhande has given replay to former minister Ram Shinde

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here