Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आणखी ९ करोनाबाधितांची वाढ

Akole: अकोले तालुक्यात आणखी ९ करोनाबाधितांची वाढ

Akole taluka 9 corona infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज आणखी ९ करोनाबाधितांची भर पडली आहे. शेरण खेल येथे चार रेडे येथे चार, टाहकारी येथे एक व शहरात कारखाना रोड येथील एक जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या १३० इतकी झाली आहे. 

शेरणखेल येथे ५६ वर्षीय, ४५ वर्षीय पुरुष तर ५२ वर्षीय व ४० वर्षीय महिला असे चार रुग्ण आढळून आले आहेत. रेडे येथे ५६ व २५ वर्षीय महिला व ४ वर्षीय बालिका यांचा शासकीय अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. टाहकारी येथील २६ वर्षीय तरुण, आणि कारखाना रोड येथील ५० वर्षीय व्यक्ती यांचा खासगी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात एकूण रुग्ण संख्या १३० झाली आहे. मयत ३ तर सध्या ४४ जणांवर उपचार सुरु आहेत.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole taluka 9 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here