Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा फडणविसांना टोला: सुशांत आत्महत्येप्रकरणी कोणीही राजकारण करू नये

मुख्यमंत्र्यांचा फडणविसांना टोला: सुशांत आत्महत्येप्रकरणी कोणीही राजकारण करू नये

Sushant singh Rajput suicide case

मुंबई: प्रसिद्ध अभिनेता यशस्वी प्रवास करणारा सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्याने सर्वाना धक्का बसला आहे. सुशांत आत्महत्येमागचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. सुशांतची हत्या केल्याचा दावा करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मुंबई पोलीस तपास करीत आहे. अनेकांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. याच दरम्यान सुशांत आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sushant singh Rajput suicide case)

कोणीही राजकारण करू नये. मुंबई पोलीस सक्षम आहेत, कोणाकडे काही पुरावे असतील तर ते सादर करावे असे मुख्यमंत्री यांनी म्हंटले आहे. आम्ही याची चौकशी करून शिक्षा देऊ मात्र या प्रकरणाचा मुंबई आणि बिहार राज्यांदरम्यान वाद निर्माण करण्यासाठी करू नये अस उद्धव ठाकरे म्हंटले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी सुशांत आत्महत्या प्रकरणी ट्वीट केलं होत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबी आयकडे देण्यात यावा अशी लोकांची इच्छा आहे. मात्र राज्यसरकारची तशी इच्छा दिसत नाही त्यांनतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणीही राजकारण करू नये असे प्रतिक्रिया दिली आहे.

फडवणीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. ते मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर शंका घेत आहेत. याच पोलिसांसोबत पाच वर्ष कामे केली आहे. सुशांत सिंह प्रकरणी पोलिसांचा योग्य दिशेने प्रवास सुरु आहे. कोणाकडे काही पुरावे असतील तर पोलिसांकडे सादर करावे. सुशांत चाहत्यांनी मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवावा अस एका वृतवाहिनीच्या मुलाखतीत म्हंटले आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: No one should do politics in Sushant suicide case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here