Home अहमदनगर Ahmednagar | Accident | वाळूचा ट्रक पलटी होऊन चालक ठार

Ahmednagar | Accident | वाळूचा ट्रक पलटी होऊन चालक ठार

Ahmednagar sand truck overturned, killing the driver 

Ahmednagar News| Rahuri| राहुरी: राहुरी तालुक्यातील मालुजे खुर्द-मालगाव शिवारात वाळूचा डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात (Accident) चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  मालुजे खुर्द-मालगाव शिवारात सुरू असलेल्या वाळूच्या लिलावाच्या ठिकाणी ढिगाऱ्यावर एक डंपर पलटी होऊन डंपरखाली सापडून चालक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

शनिवारी सकाळच्या दरम्यान येथे वाळूने भरलेला डंपर चालला असता सदर डंपर एका ढिगा-यावरून घसरण्यास लागला असता डंपर पलटी होणार तोच सदर चालकाने स्वतःचा बचावासाठी खाली उडी घेतली. मात्र दुर्दैवाने तोच ढंपर त्याच्या अंगावर पलटी झाल्याने डंपर चालक जागीच ठार झाला. दत्तात्रय राजू लष्करे (राहणार राहुरी गावठाण वय 38)  असं या मयत चालकाचं नाव असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Ahmednagar sand truck overturned, killing the driver

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here