Home औरंगाबाद Rape | धक्कादायक! 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फरपटत नेत धमकी देऊन अत्याचार

Rape | धक्कादायक! 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फरपटत नेत धमकी देऊन अत्याचार

16-year-old girl rape and threatened

Aurangabad  News | औरंगाबाद : मागील आठवड्यात औरंगाबाद शहरात एका 19 वर्षीय तरुणीचा एकतर्फी प्रेमातून भरदिवसा खून (Murder) केल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आल्याने जिल्हा हादरला आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं तोंड दाबून शेतात फरपटत नेऊन तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही धककादायक घटना गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा गावात घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी अनिकेत उर्फ अन्या ज्ञानेश्वर चव्हाण ( वय-२१वर्ष, रा. गवळीशिवरा, ता. गंगापूर) या नराधम आरोपीस अटक केली आहे.  

याबाबत सविस्तरपणे माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे वाजता अल्पवयीन पीडिता अंघोळीसाठी बाथमरूममध्ये जात होती. यावेळी नराधम आरोपीनेतिच्यावर पाळत ठेवून तिचा तोंड दाबून तिला फरपटत गायरान शेतीमध्ये घेऊन गेला. त्यांनतर पाण्याच्या हौद जवळ नेऊन पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली. याचाच फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार (Sexual abusing) केला आणि तो फरार झाला.

या सर्व घटनेनं पीडित मुलगी घाबरली होती. त्यांनतर घडलेला सर्व प्रकार मुलीने घरातील कुटुंबियांना सांगितला. मुलीच्या घरच्यांनी मुलीसह शिल्लेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीनुसार बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर  पोलिसांनी आरोपीला अटक (Arrested) केली आहे.

Web Title: 16-year-old girl rape and threatened

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here