Home संगमनेर संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात एक जण….Accident

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात एक जण….Accident

Ahmednagar Terrible car accident on Pune-Nashik highway

Ahmednagar | Sangamner | संगमनेर: तालुक्याच्या पठार भागातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील 19 मैल परिसरात भरधाव कारच्या धडकेमध्ये (Accident) एक जण गंभीर जखमी झाल्याची घटनाघडली आहे. हा अपघात शनिवार दिनांक 28 मे रोजी पावणे पाच वाजेच्या सुमारास घडला. (Ahmednagar News)

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  अमेय अरविंद रोकडे रा. बाणेर पुणे यांच्या मालकीची कार (क्रमांक  एम एच 12 एम एफ 6058)  हीच्यातून  नाशिक वरून पुण्याच्या दिशेने जात होते. शनिवारी दुपारी 19 मैल परिसरात आले असता ज्ञानेश्वर श्रीधर सुपेकर वय 35 रा. नांदूर हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक एम एच 17 बी एच 0441) हीच्यावरून नांदुर च्या दिशेने जात असताना 19 मैल येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या  कारने जोरदार धडक दिल्याने सुपेकर हे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी  हवालदार उमेश गव्हाणे सुनील साळवे अरविंद गिरी ,योगीराज सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेत येथील अपघात ग्रस्तांना मदत कार्य करत जखमींना खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Ahmednagar Terrible car accident on Pune-Nashik highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here