मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला १० वर्ष सक्तमजुरी
Ahmednagar: अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Sexually abusing) केल्याप्रकरणी नाना लक्ष्मण शिंदे वय ३५ रा. भिंगारदिवे मळा सावेडी याला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
Ahmednagar | अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र व न्यायाधीश श्रीमती एम. एच. मोरे यांनी आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. नाना लक्ष्मण शिंदे असे आरोपीचे नाव आहे.
नगर शहरातील एका मुलीवर आरोपीने अत्याचार केला होता. सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. नगर शहरातील अल्पवयीन मुलगी ही शिवण क्लासला जाते म्हणून घरातून बाहेर पडली होती. परंतु संध्याकाळपर्यंत ती परत आली नाही म्हणून त्यांनी तिचा शोध घेतला. त्यानंतर फिर्यादी यांनी चौकशी केली असता मुलगी ही आरोपीसोबत निघून गेल्याचे समजले होते. त्यानंतर याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. शोध घेतल्यानंतर मुलीने आरोपीने अत्याचार (Sexually abusing) केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ३ व ४ इत्यादी कलम वाढवण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जी. ए. केदार, पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोने, सहायक निरीक्षक आर. एन्. पिंगळे यांनी केला.
Web Title: Ahmednagar Sexually abusing Accused sentenced to 10 years hard labor