Home संगमनेर संगमनेर: घरातून निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

संगमनेर: घरातून निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

Dead body of a young man who had left the house was found

Sangamner | संगमनेर:  घरात वाद झाल्याने घरातून निघून गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मोधळवाडी घाटाच्या परिसरात वनविभागाच्या हद्दीत शुक्रवारी (दि. ८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आढळला. हृषिकेश जालिंदर गिरी (वय २३, रा. इंदिरानगर, संगमनेर) असे मृत युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी स्वप्निल बाबासाहेब भारती (३० वर्ष, रा. आंभोरे, ता.संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.८) संगमनेर तालुक्यातील पठारभागात हृषिकेशचे मित्र त्याचा शोध घेत -असताना मित्रांना मोधळवाडी घाटाच्या वनविभागाच्या हद्दीत हृषिकेशची दुचाकी दिसून आली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक संतोष खैरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Dead body of a young man who had left the house was found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here