Home अहमदनगर शिक्षक बँकेसाठी इतके टक्के मतदान, उद्या निकाल होणार स्पष्ट

शिक्षक बँकेसाठी इतके टक्के मतदान, उद्या निकाल होणार स्पष्ट

Ahmednagar Shikashak bank Election: एकूण १०२३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

Ahmednagar Shikashak bank Election

अहमदनगर: जिल्हा प्राथमिक बँकेच्या संचालक मंडळासाठी आज मतदान झाले. रविवारी सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत ९८ टक्के मतदान झाले. एकूण १०२३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीमुळे गेल्या आठ दिवसांपासून नगर जिल्ह्यातील गुरूजींचे राजकारण चांगलेच तापले होते. या निवडणुकीसाठी चार मंडळात सरळ सरळ लढत होत आहे. यात विद्यमान सत्ताधारी मंडळ गुरूमाऊली बापू तांबे गट, सदिच्छा आणि बहुजन आघाडी (राजू शिंदे), गुरूकुल आणि गुरुमाऊली रावसाहेब रोहकले गट यांच्यात लढत होत आहे.

बँकेच्या निवडणुकीसाठी सकाळपासून उत्साह दिसत होता. गुरूमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे दक्षिण जिल्ह्यात फिरत होते. तर गुरूमाऊलीच्या दुसर्‍या फळीतील नेते उत्तर जिल्ह्यत फिरत होते. सदिच्छाचे शिंदे हे मतदान करून उत्तर जिल्ह्यात फिरत होते. सर्व मंडळाकडून विजयाचा दावा होत असून शिक्षक सभासद कोणाच्या हाती बँकेच्या चाव्या देणार हे उद्या दुपारी स्पष्ट होणार आहे.

गुरूमाऊली (तांबे गट) मंडळाच्या उमेदवारांचे मतदान केंद्राच्या परिसारात महिला शिक्षक सभासदांनी औक्षण केले. त्यानंतर मतदानाला सुरूवात झाली. एकूणच जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी विक्रमी मतदान होण्याचा अंदाज आहे. निवडणूक अधिकारी गणेश पुरी, सहायक निवडणूक अधिकारी देविदास घोडचोर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

Web Title: Ahmednagar Shikashak bank Election

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here