फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर वारंवार बलात्कार
Baramati Rape Case: विवाहितेचे व आरोपीचे एकत्रित फोटो काढून व्हायरल करून नवरा व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार.
बारामती | सांगवी: विवाहितेचे व आरोपीचे एकत्रित फोटो काढून सगळीकडे व्हायरल करून नव-पास व मुलांना जीव मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर येथे एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोपी तुषार लालासो भापकर रा. कारखेल (ता. बारामती, जि. पुणे) याच्या विरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की (दि. १ डिसेंबर २०२१) रोजी दुपारी दिड वाजण्याच्यात सुमारास कारखेल येथे आरोपी तुषार भामकर यांच्या घरात तसेच (दि. २८ ऑगस्ट २०२२) रोजी पर्यंत वेळोवेळी कारखेल येथे फिर्यादीच्या घराच्या पाठीमागे तसेच मोरगाव, खामगळवाडी येथील वेगवेगळ्या लॉजवर जाऊन जबरदस्तीने शारीर संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
फिर्यादी कारखेल प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविडची प्रतिबंधक लस घेऊन रस्त्याने घरी पायी चालत जात होत्या. तुषार भापकर हा दुचाकीवरून आला असता वहिनी तुम्हाला घरी सोडतो असे म्हणुन त्याने फिर्यादीस त्याच्या घरी घेऊन गेला. यावेळी वहीनी तुम्हा मला खूप आवडता असे म्हणुन फिर्यादीस छातीशी धरून बेडवर ढकलून दिले. फिर्यादीचे तोंड दाबून बळजबरीने शारीरीक संबंध करुन तु ओरडु नकोस नाहीतर तुला खल्लास करीन अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीचे व त्याचे फोटो काढुन वेळोवेळी फिर्यादीस फोटो सगळीकडे व्हायरल करुन नव-यास व मुलाना जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देऊन वारंवार फिर्यादीवर बळजबरीने शारीरीक संबंध ठेवल्या बाबत (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लोहे अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Repeated rape of a married woman by threatening to make the photo viral