Home पुणे व्यावसायिकाकडून महिलेवर बलात्कार, फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी

व्यावसायिकाकडून महिलेवर बलात्कार, फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी

Pune Crime:  महिलेला जाळ्यात ओढून बलात्कार (Rape), नंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी.

Rape of woman by businessman, extortion of 5 lakhs 

पुणे: महिलेवर बलात्कार करुन तिच्याकडून पाच लाखांची खंडणी घेतल्या प्रकरणी एका व्यावसायिकाच्या विरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

संजय कुंदनलाल परमार (वय ५७, रा. एकबोटे कॉलनी, अंजली अपार्टमेंट, घोरपडे पेठ) असे गु्न्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. परमार यांच्या विरोधात खडक पोलिसांनी खंडणी तसेच बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित महिला आणि आरोपी परमार एकमेकांचे ओळखीचे आहेत. परमार यांनी महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेतली. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत.

Web Title: Rape of woman by businessman, extortion of 5 lakhs 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here