Home जळगाव लग्न घटिका काही दिवसांवर आलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

लग्न घटिका काही दिवसांवर आलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide News:  साखरपुडा झालेल्या तरुणीचे लग्न जवळ आले असताना आपल्या रहात्या घरात गाळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

young woman committed suicide by hanging herself a few days after her wedding

यावल  |जळगाव : साखरपुडा झालेल्या तरुणीचे लग्न जवळ आले असताना आपल्या रहात्या घरात गाळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना यावल तालुक्यातील अंजाळे येथे घडली आहे. या तरूणीने अशा प्रसंगी आत्महत्या केल्याने कुटुंबावर मोठी शोककळा पसरली. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिनल निवृत्ती भागवत (वय २३) या तरुणीने शनिवार (१५ ऑक्‍टोंबर) सकाळी दहा वाजेपुर्वी राहत्या घरातील छ्ताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केली. याबाबत मयत तरूणीचे वडील निवृत्ती किसन भागवत यांनी खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी हे करीत आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणीचे लग्न जुळून आले असून तिचा साखरपुडा झाला होता. दिवाळीनंतर विवाह नियोजित होता अशी माहीती मिळत आहे. त्यामुळे विवाहाची वेळ जवळ आली असताना तरुणीने आत्महत्या का केली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या दुर्दैवी घटनेने शोककळा पसरली आहे.

Web Title: young woman committed suicide by hanging herself a few days after her wedding

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here