Home संगमनेर संगमनेर: बोटा शिवारात अवैध वाळूचा डंपर पकडला

संगमनेर: बोटा शिवारात अवैध वाळूचा डंपर पकडला

Sangamner: विना क्रमांकाचा डंपर अवैध वाळूची (Sand) वाहतूक करून आळेफाट्याच्या दिशेने जात असल्याचे तलाठी हिरवे यांना दिसला. त्यांनी तो पाठलाग करून पकडला.

Illegal sand dumper caught in Bota Shiwar

घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा विनाक्रमांकाचा डंपर तलाठ्यांनी पकडला. शनिवारी (दि. १५ ऑक्टोबर) सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संबंधित वाहन घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील अकलापूर बोटा मार्गे अवैध वाळूची वाहतूक करणारा डंपर जाणार असल्याची माहिती नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना मिळाली. त्यानुसार बोटा गावचे तलाठी रवींद्र हिरवे हे केळेवाडी परिसरात थांबले असता त्याचवेळी एक विना क्रमांकाचा डंपर अवैध वाळूची वाहतूक करून आळेफाट्याच्या दिशेने जात असल्याचे तलाठी हिरवे यांना दिसला. त्यांनी तो पाठलाग करून पकडला. चौकशीअंती वाळू वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. यात अंदाजे चार ते पाच ब्रास अवैध वाळू असून, त्या वाहनावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.

Web Title: Illegal sand dumper caught in Bota Shiwar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here