Home अहमदनगर अहमदनगर: शालेय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर: शालेय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar | Shrirampur Suicide News:  विद्यार्थ्याने स्वतः च्या घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

School student commits suicide by hanging 

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील हिंदसेवा मंडळाच्या शांतीलाल पाटणी विद्यालयाच्या विद्यार्थ्याने काल सायंकाळी घरात एकटा असताना गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहरातील हिंद सेवा मंडळाच्या शांतीलाल पाटणी विद्यालय (मॉर्डन हायस्कूल) चा इयत्ता 9 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अथर्व अनिल लोहकरे या विद्यार्थ्याने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची पोलिसांना मिळताच. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अथर्व यास खाली उतरवून साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास मृत घोषित केले.

उद्या शवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतर अंत्यविधी केले जाणार आहे. त्याने गळफास घेतली त्यावेळी घरी कोणीच नव्हते. आई-वडीलही हिंद सेवा मंडळात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. घटना घडली तेव्हा आई-वडील दोघेही घरी नव्हते.  त्याने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी साखर कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: School student commits suicide by hanging 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here