Home अकोले अकोलेत अजित दादांच्या हस्ते अगस्तीचा गळीत व आसवानी प्रकल्पाचा शुभारंभ

अकोलेत अजित दादांच्या हस्ते अगस्तीचा गळीत व आसवानी प्रकल्पाचा शुभारंभ

Akole News: विरोधी  पक्षनेते अजित दादा पवार (Ajit Pawar) यांच्या शुभहस्ते व आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार.

Inauguration of Agasthi Gullit and Aswani project by Akole Ajit Pawar

अकोले: अगस्ती सहकारी साखर कारखानाचा गळीत हंगामाचा व आसवानी प्रकल्पाचा शुभारंभ सोमवार दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10  वाजता आयोजित करण्यात आला आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा  विरोधी  पक्षनेते अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते व आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे संचालक चंद्रशेखर घुले ,आजी आमदार भानुदास मुरकुटे, संचालक प्रशांत गायकवाड, शिवसेना उत्तर नगर अध्यक्ष रावसाहेब खेवरे ,  कम्युनिस्ट नेते कॉम्रेड कारभारी उगले, मधुकराव नवले, डॉ  अजित नवले, आरपीआय चे नेते विजयराव वाकचौरे , जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे माजी उपसभापती मारुती मेंगाळ, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, दादा  पाटील वाकचौरे, शरद देशमुख, रामहरी तिकांडे, वसंतराव मनकर आदी  प्रमुख मान्यवर उपस्थिती राहणार आहेत.

अगस्तीचे गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली असून 6 लाख मेट्रिक टन गाळपाचे नियोजन करण्यात आल्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी सांगितले.

याप्रसंगी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अगस्ती कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर ,व्हाईस चेअरमन अशोकराव भांगरे, कार्यकारी संचालक अजित देशमुख, संचालक सर्वश्री कैलासराव वाकचौरे, मीनानाथ पांडे ,परबत नाईकवाडी, असगोकराव आरोटे अशोकराव देशमुख ,रामनाथ बापू वाकचौरे, यमाजी  लहामटे मच्छिंद्र धुमाळ ,कैलासराव शेळके, पाटीलबा सावंत, विकास शेटे  प्रदीप हासे, विक्रम नवले मनोज देशमुख ,सुधीर शेळके, बादशहा बोंबले सचिन दराडे , सौ सुलोचना नवले सौ शांताबाई वाकचौरे केले यांनी केले आहे.

Web Title: Inauguration of Agasthi Gullit and Aswani project by Akole Ajit Pawar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here