Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: विवाहित तरूणाची सासुरवाडीत आत्महत्या

अहमदनगर ब्रेकिंग: विवाहित तरूणाची सासुरवाडीत आत्महत्या

Ahmednagar | Rahuri Suicide News:  तरुणाने सासुरवाडीत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Married youth commits suicide in in-laws house

राहुरी:  राहुरी तालुक्यातील उंबरे येथे एका 35 वर्षीय विवाहित तरूणाने काल पहाटेच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संभाजी दशरथ थोरात वय 35 वर्षे हा तरूण नेवासा तालुक्यातील  माळद पिंपळगाव  येथील रहिवाशी असून काही महिन्यांपासून तो उंबरे येथे सासुरवाडीत राहत होता. आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी त्याने पहाटेच्या दरम्यान उंबरे येथील त्याच्या सासूरवाडीच्या राहत्या घरात छताला असलेल्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास (Suicide) घेतला.

सकाळी घरातील इतर लोक उठल्यावर त्यांना संभाजी थोरात हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. संभाजी थोरात याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई वडील असा परिवार आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Married youth commits suicide in in-laws house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here