Home अहमदनगर Shrigonda: सीआयडी अधिकारी असे सांगून एकास लुटले

Shrigonda: सीआयडी अधिकारी असे सांगून एकास लुटले

Ahmednagar Shrigonda CID officers saying robbed one

श्रीगोंदा | अहमदनगर: सीआयडी अधिकारी असल्याचे सांगत एका व्यक्तीची १ तोळ्याची सोन्याची साखळी चोरून नेल्याची घटना श्रीगोंदा येथे घडली आहे. भीमराव कुशाबा कवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात व्यक्तीविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

काल दुपारी भीमराव कवडे हे श्रीगोंदा येथून जाणाऱ्या जामखेड ते काष्टी रस्त्यावर उभे असताना एका विनानंबरच्या दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यातील एकाने मी सीआयडी अधिकारी आहे असे सांगितले, पुढे गावात दंगल झाली असल्याने तुमच्या हातातील घडयाळ, सोन्याची साखळी व्यवस्थीत खिशात ठेवा असे सांगितले. त्याप्रमाणे कवडे यांनी सोन्याची साखळी खिशात ठेवली असता त्या व्यक्तीने रुमालात बांधून खिशात व्यवस्थित ठेवा असे सांगितले. कवडे यांच्यासमोर रुमाल धरला. तसेच रुमालात कवडे यांच्या हातातील घड्याळ व गळ्यातील सोन्याची साखळी बांधून ठेवत असल्याचे भासवत सोन्याची साखळी हातचलाखीने काढून घेत संबंधित व्यक्तीने लंपास केली. कवडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठले. कवडे यांच्या तक्रारीवरून दोन व्यक्तीविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar Shrigonda CID officers saying robbed one

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here