Home अहमदनगर अहमदनगर: आमदार होण्यासाठी ज्यांना मदत केली तेच आडवे आले

अहमदनगर: आमदार होण्यासाठी ज्यांना मदत केली तेच आडवे आले

Ahmednagar Shrigonda Loksabha Election Rajendra Nagwade 

Ahmednagar News | Shrigonda | श्रीगोंदा: ज्यांना आमदार होण्यासाठी आम्ही मदत केली त्यांनीच आमच्या ताब्यातील कारखान्याची सत्ता काढून घेण्यासाठी टोकाचे प्रयत्न केले. यापुढे अशा नेत्यांना जवळ करणार नसून आगमो विधानसभा निवडणूक आम्ही लढवणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशी गर्जना नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली आहे.

स्वर्गीय बापूंच्या संस्कारावर आमची राजकीय व सामाजिक पायाभरणी आहे. त्यांच्या विचारातूनच समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न करतोय यापूर्वी तालुक्यातील विकासाला प्राधान्य देत निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला. इतरांना संधी मिळाली तरी चालेल मात्र राजकारणाचा वेगळाच पायंडा पडू नये यासाठी दक्षता घेतली. मात्र आम्ही ज्यांना आमदार होण्ण्यासाठी मदत केली त्यांनीच आमची कारखान्याची सत्ता काढून घेण्याचे प्रयत्न केले. त्यात काही जण उघडपणे तर काही छुप्या पद्धतीने आमचे राजकारण संपविण्याचे चाल खेळत होते. आता अशा लोकांना मदत करणार नसल्याचे नागवडे यांनी म्हंटले आहे.

तालुक्यातील पिंपळगाव पिसे येथील सेवा संस्थेचे अध्यक्ष बंडू पंधरकर यांची नुकतीच नागवडे कारखान्याच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली, संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभेत नागवडे बोलत होते.

Web Title: Ahmednagar Shrigonda Loksabha Election Rajendra Nagwade 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here