Home नाशिक शेततळ्यात बुडून अभियंता तरुणीचा दुर्देवी मृत्यू

शेततळ्यात बुडून अभियंता तरुणीचा दुर्देवी मृत्यू

death of young engineer drowning in a field

Sinnar | सिन्नर: शेततळ्यात बुडून अभियंता तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या खंबाळे येथे घडली आहे. पाय घसरुन शेततळ्यात पडल्यानंतर बुडून (drowning)  एका २४ वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोनल आंधळे असं मयत तरुणीचं नाव आहे. शेततळ्यात पडल्यानंतर तिला पोहता येत नव्हतं ती स्वतःला वाचवू शकली नाही. सोनल ही ३ दिवसांपूर्वीच कल्याणहून आपल्या गावी आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की,  खंबाळे येथे भाऊसाहेब किसन आंधळे हे पत्नी मंदाकिनी, मुलगा विशाल आणि मुलगी सोनल यांच्यासह राहत असून ते  शेती करतात. त्यांचे गट नं. ४७९ मध्ये शेततळे असून २८ मे ला सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास भाऊसाहेब आंधळे आणि मुलगी सोनल हे दोघे शेतावर शेततळ्यात पाणी किती आहे हे पाहण्यासाठी गेले होते. शेततळ्यातील पाणी पाहिल्यानंतर मुलगी सोनल वडिलांना म्हणाली की, तुम्ही घरी जा, मी थोडावेळ थांबते आणि मग येते. असं म्हटल्याने वडिल भाऊसाहेब हे घरी अंघोळ करण्यासाठी निघून आले.

यानंतर अर्धा तास होऊनही मुलगी सोनल घरी न परतल्याने भाऊसाहेब यांनी पुन्हा शेतात जाऊन पाहिले असता ती तेथे दिसली नाही. त्यामुळे भाऊसाहेब यांनी आजूबाजुला शोध घेतला. यावेळी शेततळ्यावर जाऊन पाहिले असता मुलगी सोनल शेततळ्यात बुडाल्याचे दिसून आले.

यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने सोनलला शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. तिला उपचारांसाठी त्वरीत दोडी ग्रामीण रुग्णालायात हलविण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिला मयत घोषित केले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मित नोद करण्यात आली आहे.

Web Title: death of young engineer drowning in a field

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here