Home अहमदनगर महामार्गावर फुटपाथवर झोपलेल्या तिघांना आयशर टेम्पोने चिरडले

महामार्गावर फुटपाथवर झोपलेल्या तिघांना आयशर टेम्पोने चिरडले

Ahmednagar sidewalk were crushed by the Eicher tempo

अहमदनगर | Ahmednagar: नगर सोलापूर महामार्गावर शहराजवळ असलेल्या चांदणी चौकात रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेल्या तिघांना रात्रीच्या सुमारास आयशर टेम्पोने चिरडल्याची घटना घडली आहे.हा अपघात रात्री दोन वाजेच्या सुमारास घडला.

या अपघातात एक बूट विक्रेता जागीच ठार झाला आहे. तर दोघे बूट विक्रेते व टेम्पोतील दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

सोलापुरातून नगर या दिशेने एक मालवाहू आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण चांदणी चौकातील आरटीओ ऑफिस जवळ सुटल्याने फुटपाथवर परप्रांतीय बूट विक्रेते यांना झोपेते असताना आयशर टेम्पोने चिरडले.  

मेहताब शेख वय २१ रा. उत्तरप्रदेश याचा जागीच मृत्यू झाला आहे. मुसाइद शेख व जावेद शेख हे जखमी झाले आहेत.

Web Title: Ahmednagar sidewalk were crushed by the Eicher tempo


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here