Home महाराष्ट्र एका तरुणीला अॅसिड व पेट्रोल टाकून जाळले, १२ तास रस्त्यावर पडून

एका तरुणीला अॅसिड व पेट्रोल टाकून जाळले, १२ तास रस्त्यावर पडून

Girl was burnt by throwing acid and petrol

बीड: जिल्ह्यातील येळब घाट येथे प्रेयसीवर अॅसिड व पेट्रोल टाकून जाळून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

या घटनेसंदर्भातील ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी करत म्हंटले की, महिला अत्याचार घटनांत वाढ होत आहे. तसेच याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सावित्रा दिगंबर अंकुलवार वय २२ रा. शेळगाव ता.देगलूर जि. नांदेड असे या मृत तरुणीचे नाव आहे. ती शेलगावातीलच अविनाश राजुरे या तरूणाबरोबर गेल्या काही दिवसांपासून पुणे येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. दिनांक १३ नोव्हेंबरला रात्री दोघे पुणे येथून गावी जाण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास येलंब घाट परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबविली. रस्त्याच्या कडेला घेऊन अॅसिड व पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. त्यानंतर आरोपी तरुण तेथून पसार झाला. या घटनेत सावित्रा ४८ टक्के भाजली होती. ऐन दिवाळीच्या तोंडावर घटना घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तसेच ही तरुणी १२ तास रस्त्यावर पडून होती. दुसऱ्या दिवशी दोन वाजता रस्त्यावर जाणार्यांना आवाज आल्याने खड्ड्यात पाहिले असता अर्धवट जळलेल्या अवस्थेत तरुणी दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना बोलाविण्यात आले आणि घटनास्थळाचा पंचनामा करून तरुणीला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार करण्यात आले मात्र ४८ टक्के भाजल्याने तिचा मृत्यू झाला.

Web Title: Girl was burnt by throwing acid and petrol


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here