Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याचा दहावीचा इतका टक्के निकाल | Ahmednagar SSC Result 2022

अहमदनगर जिल्ह्याचा दहावीचा इतका टक्के निकाल | Ahmednagar SSC Result 2022

Ahmednagar SSC Result 2022

Ahmednagar SSC Result 2022 | अहमदनगर: राज्याचा दहावीचा निकाल आज दुपारी ऑनलाईन जाहीर झाला असून या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा जाहीर झाला आहे.यामध्ये नगर जिल्ह्याचा निकाल हा 96.24 टक्के लागला असून दहावीसाठी जिल्ह्यातून 71 हजार 101 नोंदणी केली होती. यातील 70 हजार 447 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर 67 हजार 800 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात 29 हजाार 511 मुली दहावीत पास झाल्या असून त्याची टक्केवारी 97.66 टक्के असून 38 हजार 289 मुले पास झालेली असून त्यांची टक्केवारी ही 95.17 टक्के आहे.

Web Title: Ahmednagar SSC Result 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here