Home संगमनेर Accident: संगमनेर: ट्रॅक्टर उलटून अपघात, एक जण ठार

Accident: संगमनेर: ट्रॅक्टर उलटून अपघात, एक जण ठार

Sangamner Accident One killed in tractor overturn

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागात दुर्दैवी घटना (Accident) घडली आहे. ट्रॅक्टर उलटून एक जण जण जागीच ठार झाल्याची घटना कर्जुले पठार येथील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बाजूच्या रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.  

याबाबत मिळालेली  अधिक माहिती अशी की,  योगेश विलास बर्डे (वय 22, रा. नायगाव थेऊर, पुणे) हा कर्जुले पठार येथील नातेवाईकांकडे आलेला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नाशिकच्या दिशेने ट्रॅक्टरमधून वरूडी फाट्याकडे येत होता. त्यानंतर ट्रॅक्टर गावाच्या पुढे आल्यानंतर थेट पलटी झाला. यामध्ये ट्रॅक्टरखाली दबून योगेश बर्डे याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, मनेष शिंदे, योगीराज सोनवणे, उमेश गव्हाणे, नंदू बर्डे, अरविंद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीला पाचारण करुन अपघातग्रस्त ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला घेतला. या घटनेची पोलिसांनी नोंद केली आहे.

Web Title: Sangamner Accident One killed in tractor overturn

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here