Home अहमदनगर प्रियकराच्या त्रासाला कंटाळून मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

प्रियकराच्या त्रासाला कंटाळून मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar Suicide by strangling a girl after getting fed 

अहमदनगर | Ahmednagar: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून नगर शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपी हा रा. वारजे माळवाडी पुणे येथील आहे सोहेल शेख असे त्याचे नाव आहे. सोहेल शेख याच्या त्रासाला कंटाळून नगर शहरातील १५ वर्षाच्या मुलीने २५ नोव्हेंबरला दुपारी राहत असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत मुलीच्या आईने फिर्याद दिली यावरून सोहेल शेख याच्याविरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी व पोस्को कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत मुलगी ही दीड वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत वारजे माळवाडी पुणे येथे नातेवाईक यांच्याकडे आली होती. तिची सोहेल शेख सोबत ओळख झाली. तेव्हापासून शेख व सदर मुलगी एकमेकांच्या संपर्कात होते.

फेब्रुवारी व मार्च महिन्यात शेख याने सदर मुलीच्या वडिलांना फोन करून नातेवाइकांने तिच्यासोबत काढलेला फोटो इन्स्टाग्राम पोस्ट केला होता. यावरून सोहेल शेख याने फोटो पोस्ट करणाऱ्या तरुणाला शिवीगाळ केली होती. तसेच सदर मुलीस वारंवार फोन करून त्रास दिला आरोपी शेख याने मुलगी अल्पवयीन असल्याने तिला वारंवार फोन करून प्रेमसंबंध तयार केले. तिला धार्मिक परिवर्तन करण्यासाठी बळजबरी करून त्रास दिला. याचा जाचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Ahmednagar Suicide by strangling a girl after getting fed 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here