Home संगमनेर संगमनेर: लग्नसमारंभात मंगल कार्यालयातून दागिन्यांची चोरी

संगमनेर: लग्नसमारंभात मंगल कार्यालयातून दागिन्यांची चोरी

Sangamner Theft of jewelery wedding ceremony

संगमनेर: संगमनेर लोणी रस्त्यावर गणपती मंदिरासमोरील मंगल कार्यालयात लग्न समारंभातून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण एक लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्त चिमाजी सेनेकर वय ६४ रा. अकोले यांनी फिर्याद दाखल केली आहे. लोणी रोडवर गणपती मंगल कार्यालयासमोर मंगल कार्यालयात सेनेकर यांच्या मुलाचे लग्न होते. लग्नासाठी त्यांनी दागिन्यांची खरेदी केली होती.

मंगल कार्यालयात एका खोलीत लग्नाचा कार्यक्रम सुरु असताना ४५ हजर ६०० रुपये किमतीचे ९ ग्राम वजन असलेले झुमके, २५ हजार रु. किमतीची अर्ध्या तोळ्याची अंगठी तीन हजार रुपयांचा करंडा, दहा हजार रुपयांचे दोन मोबाईल व २० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी खोलीत ठेवलेले दागिने आणण्यासाठी सेनेकर गेले असता त्यांना तेथे ठेवलेले दागिने मिळून आले नाहीत. दागिने वस्तू व पैसे चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर सेनेकर यांनी फिर्याद दाखल केली असून यावरून गुन्हा दाखल केला आहे.   

Web Title: Sangamner Theft of jewelery wedding ceremony

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here