Home Suicide News Suicide: राहत्या घरात विवाहितेची आत्महत्या, तिघांवर गुन्हा

Suicide: राहत्या घरात विवाहितेची आत्महत्या, तिघांवर गुन्हा

Ahmednagar Suicide of a married woman in the living room 

अहमदनगर | Ahmednagar | Suicide: सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये शुक्रवारी घडली आहे. रोहिणी प्रशांत बुऱ्हाडे (वय 27) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

रवींद्र भिमाशंकर डहाळे (रा. शेवगाव) यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह प्रशांत संतोष बुऱ्हाडे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) यांच्याशी झाला होता.

विवाहानंतर काही महिन्यांनी रोहिणीचा विविध कारणांसाठी छळ सुरू केला. या छळाला कंटाळून रोहिणी हिने शुक्रवारी गुलमोहर रस्त्यावरील राहत्या घरात आत्महत्या केली.

रवींद्र डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात प्रशांत डहाळे (पती), संतोष (सासरा) आणि सुनिता (सासू) या तिघांविरुद्ध गुन्हा(Crime Filed) दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Ahmednagar Suicide of a married woman in the living room 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here