Theft: संगमनेर शहरात दिवसाढवळ्या घरातून दागिन्यांची चोरी
संगमनेर | Theft: संगमनेर शहरातील मालदाड रोड येथील प्रेरणानगर सिद्धिविनायक हौसिंग सोसायटी येथे एका घरातील जिन्यातून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने सुमारे ६२ हजार पाचशे रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, मालदाड रोड येथे सिद्धिविनायक हौसिंग सोसायटी येथे अनिल शमुवेल सांगळे यांचे घर असून गुरुवारी सकाळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने जिन्यातून घरात प्रवेश करत घरात कपाटात ठेवलेले दोन तोळे सोन्याचे नेकलेस व पाच ग्राम सोन्याचे टोप असा सुमारे ६५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अनिल सांगळे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Jewelry theft from a house in Sangamner in broad daylight