Home Accident News Accident: मोटारसायकल व स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नी ठार

Accident: मोटारसायकल व स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नी ठार

Shrigonda Accident of Motarcycle and swift Car Two Death

श्रोगोंदा | Accident | Shrigonda: नगर – दौंड महामार्गावरील विसापूर फाटा शिवारात भरधाव वेगातील बुलेट मोटारसायकल व स्विफ्ट कारच्या झालेल्या भीषण अपघातात (Accident) दुचाकीवरील पती पत्नी ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात महंमद शफी शाफुद्दिन शेख (वय ५०) व शबाना महंमद शफी शेख (वय ४५) अशी त्या मयत दाम्पत्याची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोणी व्यंकनाथ येथील शेख हे पत्नीसोबत दुचाकीवरून नगरच्या दिशेने जात असताना विसापूर फाट्याजवळ नगर कडून दौंडच्या दिशेने जाणाऱ्या विना नंबरच्या स्विफ्ट डिझायर चारचाकी गाडीची जोराची धडक झाली.या धडकेत बुलेट गाडी वरील शबाना महंमद शफी शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर महंमद शफी शेख यांचा रुग्णालयात नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी धाव घेत जखमी महंमद शफी शेख यांना रुग्णालयातदाखल केले. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात विना नंबरच्या स्विफ्ट कारच्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shrigonda Accident of Motarcycle and swift Car Two Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here