Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर ब्रेकिंग: तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar News: तरुणीने राहत्या घराच्या छताला दोरीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Ahmednagar Suicide of a young woman by hanging

कोपरगाव : तालुक्यातील नाटेगाव येथील भक्ती सुरेश गायके ( वय १८ ) या तरुणीने राहत्या घराच्या छताला दोरीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.२७) दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी नातेवाईकांच्या खबरीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत तरुणी हि कोपरगाव शहरातील सद्गुरू गंगागीर महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. दरम्यान भक्ती हिने पित्ताशयाच्या दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक आंधळे करीत आहेत.

Web Title: Ahmednagar Suicide of a young woman by hanging

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here