Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात भौतिकशास्त्रात आतापर्यंत सर्वाधिक कॉपीबहाद्दर

अहमदनगर जिल्ह्यात भौतिकशास्त्रात आतापर्यंत सर्वाधिक कॉपीबहाद्दर

HSC EXAM 2023: भौतिकशास्त्र (Physics) विषयाचा पेपर झाला. यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक १५ कॉपीबहाद्दर विविध पथकांनी पकडल्याची माहिती समोर.

Ahmednagar district, the most copycat in Physics

अहमदनगर: बारावीच्या परीक्षा सुरु असून दुसरा आठवडा सुरू झाला आहे. सोमवारी भौतिकशास्त्र विषयाचा पेपर झाला. यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक १५ कॉपीबहाद्दर विविध पथकांनी पकडल्याची माहिती समोर आली आहे.  बारावी परीक्षेस २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली.  यंदा शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभिमान राबवले असून जिल्हा परिषद, महसूलची स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. याशिवाय सात फिरते पथकही आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथक रोज असते. प्रत्येक विद्यार्थ्याची झडती घेऊनच केंद्रात प्रवेश दिला जातो. एवढी यंत्रणा अलर्ट असूनही विद्यार्थी कॉपी करण्याचे धाडस करतात.

सोमवारी (दि.२७) बारावीचा भौतिकशास्त्र विषयाचा पेपर होता. परीक्षेसाठी ३५ हजार ८२४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३५ हजार ३५९ विद्यार्थी परीक्षेस हजर होते, तर ४६५ विद्यार्थी गैरहजर होते. यात एकूण १५ कॉपीबहाद्दर विद्यार्थी पथकाने शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या पथकाने पाथर्डी तालुक्यात ८ विद्यार्थी कॉपी करताना पकडले, तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या पथकाने राहात्यात १ कॉपीबहाद्दर पकडला. पारनेर तालुक्यात पथकाला ६ विद्यार्थी कॉपी करताना आढळले.

Web Title: Ahmednagar district, the most copycat in Physics

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here