Home अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी आंदोलनास पाठींबा, कडकडीत बंद

जिल्ह्यात शेतकरी आंदोलनास पाठींबा, कडकडीत बंद

Ahmednagar Closed

अहमदनगर | Ahmedngar: दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठींबा देऊन देशव्यापी बंद मध्ये सहभागी शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी निदर्शने केली. संगमनेर, अकोले, कोपरगाव नेवासा, शेवगाव, कर्जत, राहुरी, पुणतांबा, जामखेड, श्रीगोंदा येथे व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला. सरकारने पारित केलेले तीनही कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटना व नगर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले.

या मागणीचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले. भारत बंद निमिताने नगर बाजार समितीतील सर्व गाळे व्यापाऱ्यांनी बंद ठेऊन शेतकरी आंदोलनास पाठींबा दिला. शासकीय कार्यालये, बँक, मेडिकल नेहमीप्रमाणे सुरु होती.

संगमनेर व अकोले तालुक्यात या आंदोलनास पाठींबा दर्शविला सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि भारत बंदला पाठींबा व्यक्त करण्यासाठी जेष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांनी मंगळवारी राळेगण सिद्दी येथील महात्मा गांडी पुतळ्यासमोर उपोषण केले. दिल्लीमधील शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनास हजारे यांनी यापूर्वीच पाठींबा दिला आहे.

Web Title: Ahmednagar Support the farmers’ movement in the district

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here