Home अहमदनगर स्विफ्ट गाडीने मागून दिलेल्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार

स्विफ्ट गाडीने मागून दिलेल्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार

Ahmednagar swift car and bike Accident  

अहमदनगर | Ahmednagar: स्विफ्ट गाडीने मोटारसायकलवर जाणाऱ्या दोघांना जोराची धडक दिल्याने या अपघातात दोघे मोटारसायकलस्वार ठार झाले आहेत. ही घटना सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी ११ वाजता घडली. हा अपघात दौंड नगर रोडवर चिखली बस स्थानकासमोर घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील गंगाराम बुलाखे वय ४५ दादाभाऊ खंडू बुलाखे हे दोघे आपल्या मोटारसायकल वरून दौंड ते नगर रोड ने काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास जात होते. त्याचवेळी दौंड ते नगर जाणारी स्विफ्ट कारने बुलाखे यांच्या मोटारसायकलला चिखली बसस्थानकासमोर पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत मोटारसायकलसह दोघेही रस्त्यावर फेकले गेले, या भीषण अपघातात दोघेही रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले. नंतर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रावसाहेब खंडू बुलाखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Ahmednagar swift car and bike Accident  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here