Home अहमदनगर बस प्रवासात महिलेचे पर्स मधून ५३ हजाराचे दागिने लंपास

बस प्रवासात महिलेचे पर्स मधून ५३ हजाराचे दागिने लंपास

Ahmednagar theft woman's purse during a bus journey

अहमदनगर | Ahmednagar: सणासुदीच्या दिवसांत चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. जिल्ह्यात चोरी घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. लोक अक्षरशः या घटनांपासून हैराण झाले आहेत.  

पंढरपूर ते संगमनेर संगमनेर जाणाऱ्या बस मध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिने अज्ञात दुसऱ्या महिलेने चोरून नेण्याचा प्रकार मिरजगाव बसस्थानकावर घडला आहे.

याप्रकरणी सौ. कोमल सोमनाथ जाधव वय २६, रा. माढा जि. सोलापूर यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार आपण १५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारस पंढरपूर संगमनेर जाणाऱ्या एस. टी. मध्ये प्रवास करीत असताना सदर बस ही मिरजगाव बसस्थानकावर थांबली असताना अज्ञात महिलेने आपल्याजवळ बसून पर्समधील सोन्याचे गंठन व रोख रक्कम पर्स उघडून चोरून नेले. जाधव यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.  

Web Title: Ahmednagar theft woman’s purse during a bus journey

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here