Home संगमनेर संगमनेर: पुणे नाशिक हायवेवर इनोव्हा व मोटारसायकल यांच्यात सामोरासमोर धडक

संगमनेर: पुणे नाशिक हायवेवर इनोव्हा व मोटारसायकल यांच्यात सामोरासमोर धडक

Sangamner Nashik pune highway inova  motarcycle Accident 

संगमनेर | Sangamner: घारगाव शिवारात पुणे नाशिक हायवेवर मुळा नदीच्या पुलावर मोटारसायकलवरून येणाऱ्या तरुणास समोरून इनोव्हाने जोरदार धडक दिल्याने २० वर्षाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीकृष्ण बबन हुलवळे वय २० रा. संगमनेर खुर्द हा मोटारसायकल क्रमांक एम. एच.१७ ए.एम. १५२२ ने पुण्याहून संगमनेरच्या दिशेने नाशिक पुणे हायवेवरून येत असताना घारगाव शिवारात मुळा नदी पुलावर इनोव्हा वरील चालकाने त्याची इनोव्हा कार विरुद्ध दिशेने चालवून मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये श्रीकृष्ण हुलवळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी बबन हुलवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर हे करीत आहेत.     

Web Title: Sangamner Nashik pune highway inova  motarcycle Accident


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here