आयशर टेम्पो उभा करून चालकावर हल्ला करत लुटले
अहमदनगर | Ahmednagar: नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सद्यस्थिती महिन्यात हे प्रकार अधिक वाढीस लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.
नगर तालुक्यातील शेंडी बायपास येथे आयशर टेम्पो उभा करून चालकावर हल्ला करत लुटल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाहनचालक विक्रांत रत्नाकर मकासरे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नगर तालुक्यातील शेंडी बायपास येथे डीझेल संपल्याने रस्त्याच्या कडेला आयशर टेम्पो उभा करून थांबलेल्या चालकावर चार चोरट्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चालकाकडील रोख रकमेसह १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले. याबाबत सहायक निरीक्षक पाठक हे अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Ahmednagar tempo and attacked the driver robbing him