Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील घटना, तलाठी व महसूल कर्मचाऱ्याला मारहाण

संगमनेर तालुक्यातील घटना, तलाठी व महसूल कर्मचाऱ्याला मारहाण

Sangamner Talathi and Revenue employee beaten

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात घारगाव शिवारात नाशिक पुणे महामार्गावर मंगळवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास वाळू तस्करांनी तलाठी व महसूल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत असलेले डंपर संगमनेर तहसील कार्यालयातील अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथकाने पकडले असता ही मारहाण करण्यात आली.

याबाबत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह. अविनाश रोहिदास डोंगरे रा. अकलापूर ता. संगमनेर, संकेत हरिभाऊ लामखेडे रा. केळेवाडी ता. संगमनेर असे या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

तलाठी रवींद्र मुकुंदराव हिरवे यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार तालुक्यात नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा केला जातो. वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार अमोल निकम यांनी अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथक कार्यरत करण्यात आले.

हे पथक मंगळवारी रात्री गस्तीवर असताना पथकातील तलाठी हिरवे यांना अकलापूर येथून वाळूने भरलेला डंपर येत असल्याची माहिती मिळाली. हिरवे यांनी याबाबत घारगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना माहिती दिली. त्यांना सोबत घेऊन मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर घारगाव शिवारातील कुरकुंडी फाटा येथ वाळूने भरलेले डंपर पथकाने पकडले. हे डंपर घारगाव पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना अविनाश डोंगरे हा स्कॉर्पियो गाडीतून आला. त्याने डंपरला गाडी आडवी लावून त्यांना थांबवून तलाठी हिरवे व पथकातील कर्मचाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. चालकाला डंपरमधील वाळू खाली करण्यास सांगितले. वाळू खाली केल्यानंतर डंपर पळवून नेण्यात आले. ह दोघेही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Sangamner Talathi and Revenue employee beaten

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here