Home अहमदनगर झेंडा लावण्यावरून तणाव; दोन गटांत समोरासमोर दगडफेक

झेंडा लावण्यावरून तणाव; दोन गटांत समोरासमोर दगडफेक

Ahmednagar Tension over flag hoisting

अहमदनगर | Ahmednagar: नगर-दौंड महामार्गावरील अरणगाव येथे चौकात झेंडा लावण्यावरून दोन गटांत वाद झाला. नगर तालुक्यातील अरणगाव येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याबाबत दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही आज पुन्हा दोन गटांनी समोरासमोर येऊन दगडफेक झाली. पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झेंडा लावण्यावरून गेल्या दोन-चार दिवसांपासून वाद सुरू आहे. पोलिसांनी वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले. नगर तालुका पोलrस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सानप यांनी गावात जाऊन बैठक घेतली. गावकरी या बैठकीला उपस्थित होते. वाद न वाढवण्याचं तिथं ठरलं मात्र,चौकात झेंडा लावायचाच असेल तर दोन्ही झेंडे लावावेत असंही काहींचं मत होतं. त्यानुसार दुसरा झेंडा घेऊन येण्याची तयारी सुरू असतानाच मतभेद वाढत गेले. दोन गट आक्रमक होत समोरासमोर येत  काहींनी दगडफेकही केली.

गावात आधीपासूनच काही पोलिसांचा बंदोबस्त होताच. आणखी पोलीस बळ बोलावण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी धावून आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, गावातील दुकाने बंद करण्यात आली. इतरही व्यवहार बंद करण्यात आले. जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Ahmednagar Tension over flag hoisting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here